सन २०२६-२७ या वर्षामधील इ. ११ वी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ऑपन टू ऑल 01

Kolhapur news
By -

 

            


         

                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   



     गुणवत्ता यादी दि. ३ जुलैरोजी दुपारी 3.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमध्ये जावून CAP Admission मधील CAP Allotment status या ऑप्शनवर क्लिक करून आपणास कोणते कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले आहे हे तपासून घ्यावे. 



 विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट झालेल्या कनिष्ठ महावि‌द्यालयात प्रवेश हवा असल्यास वि‌द्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमध्ये जावून Upload Document या ऑप्शनवर क्लिक करून आपले कागदपत्रे अपलोड करून CAP Admission मधील आपली सहमती Proceed for admission या ऑप्शनवर क्लिक करून संबंधित कनिष्ठ महावि‌द्यालयात विहीत कालावधीत प्रत्यक्ष जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांस पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. जर विद्यार्थ्यास त्यांच्या पसंतीक्रमाच्या २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महावि‌द्यालय ॲलॉट झाले असेल वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत वि‌द्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील फेरीच्या सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केलल्या जातील त्याप्रमाणे कार्यवाही करावी.



    ज्या विद्यार्थ्यांनी दि.29/06/2026 ते दि. 01/07/2026 या कालावधीमध्ये इन-हाउस व अल्पसंख्याक कोटयाकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रवेश अर्ज लॉक केला असेल व केंद्रीय कोट्याचा पण प्रवेश अर्ज भरून लॉक केला असेल अशा वि‌द्यार्थ्यांना दोन्ही कोटा (इन-हाउस व अल्पसंख्याक) व केंद्रीय गुणवत्ता यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट होवू शकतात. अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या महावि‌द्यालयात कोणत्या कोटयातून प्रवेश निश्चित करावयाचा आहे हा सर्वस्वी निर्णय संबंधित विद्यार्थी / पालकांचा असेल इन-हाउस, अल्पसंख्याक व केंद्रीय कोटयासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचा कालावधी हा दि. 03/07/2026 ते दि.06/07/2026 असा असेल.


    वि‌द्यार्थ्यांनी SMS वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आपल्या लॉगीनमध्ये आपल्याला केंद्रीय कोटयांतर्गत कोणते कनिष्ठ महाविद्यालय अ ॲलॉट झाले हे पहावूनच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी जावे.



    ज्या विद्यार्थ्यांस विशेष फेरी  ऑपन टू ऑल 01 गुणवत्ता यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला इ. १० मध्ये मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे कट-ऑफ याचा विचार करून विशेष फेरी  ऑपन टू ऑल 02  फेरीमध्ये आपल्या प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कनिष्ठ महावि‌द्यालयाचे पसंतीक्रम भरून आपला प्रवेश अर्ज भाग २ लॉक करून प्रिंट काढणे आवश्यक आहे.



वि‌द्यार्थ्याने कोणत्याही कोटयातून (केंद्रीय ऑनलाईन / अल्पसंख्याक / इन-हाऊस / व्यवस्थापन कोटा) एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो. अशी माहिती प्रसिद्धीस शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली.


               -------------------------