कोल्हापूर न्यूज नेटवर्क
टीईटी कायम रद्द करावी,पदोन्नतीसाठी टी ई टी सक्ती रद्द करावी, शाळा संच मान्यतेच्या जाचकअटी रद्द कराव्यात तसेच बीएलओ व एसआयआर कामांसाठी शिक्षकांना दिलेले आदेश त्वरित रद्द करावेत या मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सामुदायिक रजा घेवून शाळा बंद आंदोलन गुरुवार दि 9 जुलै रोजी केले जाणार असून त्या आंदोलनात संस्था चालक संघ, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना शाळा बंद ठेवून सहभागी होणारी असलेची माहिती जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी . लाड यांनी दिली .
मुख्याध्यापक संघामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ तसेच सर्व संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये सर्वांनुमते शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला .
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी लाड म्हणाले की राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये टीईटी पात्रता , पदोन्नती , संचमान्यता ' व एसआयआर साठी काढलेल्या शिक्षक कामगिरीमुळे शिक्षकांच्या तीव्र असंतोष आहे .त्यासाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे . या शाळाबंद आंदोलनामध्ये सर्व शिक्षक कर्मचार्यी सहभागी होणार असून त्यांचा दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे . तरी या मोर्चासाठी सर्वांनी दसरा चौक येथे सकाळी ठीक दहा वाजता जमावे असे आवाहन त्यांनी केले .
तसेच टप्पा वाढ अनुदानासाठी दि ७ व ८ जुलै रोजी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत . सदर दिवशी सर्वांनी काळ्या किती लावून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेचेही त्यांनी जाहीर केले .
या बैठकीस मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार 'शिक्षक नेते दादा लाड ,भरत रसाळे , आर वाय .पाटील , सी .एम गायकवाड ,सुधाकर निर्मळे,सुधाकर सावंत , उमेश देसाई ,राजाराम वरुटे , राजेंद्र कोरे , इरफान अन्सारी , संतोष आयरे, विलास पिंगळे, सुनील पवार, यशराज गाडे, सचिन कोंढरे , सावंता माळी , बालाजी पांढरे , संतोष गायकवाड , दिलीप माने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------


