भक्तिमय वातावरणात वट सावित्री उत्सव मुरगूड मध्ये संपन्न

Kolhapur news
By -

 


            



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


आज वटपौर्णिमा असून या दिवशी सुवासिनीं नी  वट सावित्री चा सण उत्साहात साजरा केला. सती सावित्री ने यमलोकी गेलेल्या आपल्या पतीला परत मिळवण्यासाठी वडाच्या झाडा खा ली  बसून कठोर तपश्चर्या केली. यम देवानी पतीचे प्राण. परत केले अशी पौराणिक कथा आहे.


  आजच्या दिवशी धार्मिक परंपरेनुसार सुवासिनी उपवास करतात व वडाच्या झाडाला प्रदीक्षिणा घालत आपल्या पतीला भरपूर आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतात.


   मुरगूड शहरात जागोजागी वट वृक्षा च्या ठिकाणी वट पौर्णिमा पूजेचे दृश्य पहायला मिळाले.कांही  महिलांनी आपल्या अंगणातच कुंडीतील वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालून पूजा केली.


    डिजिटल क्रांती च्या युगात आणि मोबाईल च्या  मैत्रीत सुद्धा महिला वर्गाने जपलेल्या पारंपारिक श्रद्धे मुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून आले.


          -----------------------------