कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दि.०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावा महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शाळा कृती समिती - कोल्हापूर यांच्या वतीने डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे शनिवार दि.२२ ऑगस्ट २०२६ रोजी दु.२.०० वा. आयोजित केला आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्ध पत्रकामधील आशय असा की, दि.०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त्त विना अनुदानित /अंशतः अनुदानित, कायम आस्थापनेवरील, नियमित वेतन श्रेणीतील व तद्नंतर १००% अनुदान प्राप्त प्राथ., माध्य. व उच्च माध्य. शाळा व तुकड्यांवरील शिक्षक / कर्मचाऱ्यांना देय १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियनित करणेबाबत गेली अनेक वर्षे शासन स्तरावर तसेच काही पेन्शन पिडीत बांधव सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करीत आहेत. नऊ-दहा वर्षे विनाअनुदानित सेवा करून तदनंतर १००% अनुदानांवरती कार्यरत आहेत. यापैकी हजारो शिक्षक-कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर विना पेन्शन जीवन जगत आहेत. राज्यातील सुमारे २६००० शिक्षक / कर्मचाऱ्यांना देय जुनीच १९८२ ची पेन्शन योजना नियमित करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पेन्शनचा निर्णायक लढा कोल्हापूर मधून सुरु करण्याचा निर्धार करून हजारो पेन्शन पिडीत बांधवांचा हा एल्गार मेळावा आयोजित केला आहे .
आपला पाठिंबा, मार्गदर्शन व शासन स्तरावर आपले मोलाचे सहकार्य मिळावे, यासाठी सदर मेळाव्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे बाबासाहेब पाटील, सुरेश संकपाळ,दत्ता पाटील आदींनी केले आहे.


