कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरील उड्डाणपूलाचे काम मार्गी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी याबाबत मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी तसे आश्वासाब दिले असल्याचेही समजते.
या साठी मुरगूड, दौलतवाडी करंजीवणे,हळदी इत्यादी गावच्या नागरिकांनी जन आंदोलन उभे केले होते. तलाव भरला की सांडव्या चे पाणी रस्त्यावर येते. त्यावर शेवाळ साठुन अनेक अपघात होतात हे आंदोलक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले होते. सद्या कागल मुरगूड गडहिंग्लज या सिमेंट काँक्रिट राज्य रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. याच रस्त्यावर हा पूल होणार असलेने वाहतुकीच्या दृष्टीने त्याचे महत्व अधिक आहे.
या सारख्या कांही अन्य पुलांच्या बाबतीत देखील मंत्रालय पातळीवर चर्चा झाल्याचे समजते. उड्डाण पुलाचे वृत्त समजल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरणार यात शंका नाही.
-----------------------------



