मुरगूड मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौकात नगराध्यक्षा सुहासिनी देवी यांनी फडकवला ध्वज.

Kolhapur news
By -

              


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौकामध्ये मुरगुडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी बहुतेक सर्व नगरसेवक आणि विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. 



      नगरपरिषद कार्यालयासमोरील ध्वजारोहण उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई आनंदा मांगले यांच्या हस्ते पार पडले.



     नगरपरिषदेच्या सुलोचनादेवी बालवाडी चे ध्वजारोहण नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाले. तर नाका नंबर एक जवळील हुतात्मा स्मारकचे ध्वजारोहण माजी नगराध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक वारसदार नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते संपन्न झाले.



     शहरातील बँका, पतसंस्था, शाळा महाविद्यालये या ठिकाणी देखील उत्साहात ध्वजारोहण झाले.मुरगूड हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाची चे ध्वजारोहण  प्राचार्य एस पी पाटील यांच्या हस्ते. एम जे इंटरनॅशनल स्कूलचे ध्वजारोहण आणि ध्वजवंदन  भारतीय सेनेचे जवान उमेश पाटील व अशोक कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. गणेश नागरी पतसंस्थेचे ध्वजारोहण संचालक एकनाथ पोतदार यांच्या हस्ते  तसेच मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थे चे ध्वजरोहण संचालिका सौ. कांचन खराडे यांचे हस्ते झाले.



   प्रत्येक ठिकाणी  वंदेमातरम गीत सामुदायिक रित्या प्रथम म्हणण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणण्यात आले. वंदे मातरम, जय जवान, जय किसान भारतमाता की जय,इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनी गरम आणि स्वादिष्ट जिलेबीची विक्री मोठ्या  प्रमाणात होतांना दिसली. जागोजागी जिलेबीचे ठेले लावण्यात आलेले दिसले.एकंदरीत शहरात 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे  उत्साही वातावरण दिसून आले.


      


                ---------------------------