80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका सफाई कामगारांनी केली ध्वज वंदन ठिकाणी स्वच्छता.शाळा, महा विद्यालये व सर्व संस्था ही सज्ज.

Kolhapur news
By -

 

              


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  उद्या 15ऑगस्ट रोजी 80वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुरगूड येथील नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांनी  ध्वज वंदन स्थळे चकाचक केली.


     नगर परिषद इमारत, तुकाराम चौक, शासकीय बाल संकुल, हुतात्मा स्मारक अशा सर्व शासकीय व सार्वजनिक ठिकाणी त्यांनी स्वच्छता केली. पावसाची रिमझिम सुरु असतानाही या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून सर्व ध्वजस्थळें चकाचक केली.


      पहाटे त्या त्या ठिकाणच्या महिला मंडळाच्या प्रतिनिधी मार्फत व शाळांमधून विद्यार्थिनींमार्फत रांगोळी घालण्यात  येणार आहे. 


      या वर्षीच्या ध्वजारोहाणाचे वैशिष्ट्य असे की राष्ट्रगीताच्या अगोदर वंदे मातरम म्हणण्यात येणार आहे. त्यासाठीचा कायदा सुद्धा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे. राष्ट्रपतींनी सुद्धा या कायद्यास मंजुरी दिली आहे.


       वंदेमातरम गीत हे राष्ट्रभक्ती चे प्रतिक असून जण गण मन हे राष्ट्रीय, समृद्धी व एकतेचे प्रतिक आहे. तिरंगा ध्वजातील तीन रंग त्याग, शांती आणि समृद्धी ची प्रतिके मानली जातात.


  सर्व शाळा, महविद्यालये, बँका, पतसंस्था, शासकीय, व निमशासकीय कार्यालयात उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.


    शहरवासियांनी आपापल्या घराच्या दर्शनी भागात तिरंगा फडकवावा व सायंकाळी उतरवून घडी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा असे आवाहन नगरपरिषदे मार्फत करण्यात आले आहे.


    तिरंग्याचा सन्मान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याचा अवमान करणे कायद्याने गुन्हा आहे.


     एकंदरीत 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सर्वत्र उत्साहात होणार यात शंका नाही.




         ------------------