बाळूमामांचा देव्हारा डाळिंबाच्या फळांनी सजला. भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी.

Kolhapur news
By -

          



       

                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

    आदमापूर येथील बाळूमामा मंदिरातील देव्हारा डाळिंबाच्या फळांनी सजवण्यात आला आहे. डाळिंब हे सिझन चे फळ आहे. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस अगदी उपयुक्त असल्याचे वैद्यकीय शात्रात सांगितले आहे.आदमापूर येथील कथित आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख करत एका भक्ताने म्हंटले बाळुमामा भक्तांच्या इच्छाशक्तीला नेहमीच बळ देतात.


  

आपल्या हयातीत त्यांनी कशाचीच अपेक्षा केली नव्हती. त्यांच्या कणखर आणि स्पष्ट वक्तव्यातून नेहमी भक्तांचे कल्याण चिंतले जायचे.लोक त्यांना शिव्या समजायचे. त्या शिव्या सुद्धा पुण्यवंताला लाभायच्या अशी समजूत होती.सोने,चांदी, हिरे, मोती अशी कसलीच अपेक्षा मामांनी ठेवली नव्हती. त्यांच्या पवित्र आणि निरपेक्ष कृपेला घोटाळ्याचे ग्रहण लागायला नको होते असे श्रद्धाळू भक्तांना वाटते.दूरदूर वरून येणारे त्यांचे भक्त अत्यंत साधे भोळे व सामान्य परिस्थिती असलेले असतात.


 मंदिराच्या मंडपात रात्र काढतात. मामांना साकडे घालतात. उद्याच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आजची डाळिंब्याची आरास पाहून भक्त गण हरखुन गेले. अनेकांनी ही विलोभनीय आरास मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली.हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या या फळांच्या देखाव्याचे कौतुक करत आमच्या श्रद्धा आणि भक्ती मधील हिमोग्लोबिन कमी करू नका अशी टिपणी घोटाळेवाल्याना उद्देशून कांही सुशिक्षित भक्तांनी केली.या टिपणीची सुद्धा चर्चा झाली.डाळिंबाची आरास मात्र मन आणि दृष्टी यांना वेधून घेणारी ठरली.



          ------------------------------