कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
वरून पावसाची रिप रिप, खाली ओला रस्ता. बाजू ने भरधाव जाणारी वाहने यांना न जुमानता हजारो युवक राज्यमार्गांवर व महामार्गांवर सुद्धा भर पावसात पोलीस भरतीचा सराव करतांना दिसत आहेत.
महाराष्ट्र शासनाने 15000 हून अधिक पोलिसांच्या भरतीची घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी आतापर्यंत किमान साडे सतरा लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. यामध्ये सशस्त्र पोलीस,रहदारी पोलीस, तुरंग पोलीस अशा विविध प्रकारच्या पोलीस भरतीसाठी लाखो युवक सराव करत आहेत.
या युवकांना ना उन्हाची तमा,ना पावसाची तमा,ना भौतिक सुविधांची आकांक्षा. उरात बाळगलेले भरतीचे स्वप्न साकार व्हावे हीच एक अपेक्षा.
भरतीसाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहता शासनाची सुद्धा एक प्रकारे कसोटी लागणार आहे.
नुकतेच NEET आंदोलन पार पडले. झारखंड मध्ये झारखंड पब्लिक सर्विस कमिशन (JPSC) मधील घोटाळ्या विरोधात स्पर्धक विद्यार्थ्याचे आंदोलन सुरु आहे.युवासंख्येचा विचार करता अशी आंदोलने होतच राहणार.
थोडा लोकसंख्या स्फ़ोटाचा आढावा घेऊ.
भारताची लोकसंख्या वर्तमान जनगणनेनुसार 147 कोटी आहे हा जणू लोकसंख्येचा स्फोटच म्हणता येईल. ही लोकसंख्या चीन पेक्षा जास्त असून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% टक्के इतकी आहे.
भारतातील युवकांची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या 27 % आहे. या युवकांच्या हाताला काम मिळायलाच हवे कारण हे युवक म्हणजे देशाचे उद्याचे भविष्य आहे.
हे भविष्य सुरक्षित केले तरच सत्तेचे सिंहासन स्थिर राहणार आहे मग सरकार कोणत्याही पक्षांचे असो. या राष्ट्रीय समस्येला सत्ताधाऱ्यांना तोंड द्यावेच लागणार आहे.
महाराष्ट्रातील पोलीस भरती हा एक सॅम्पल नमुना आहे.उन्हा पावसाची तमा न बाळगता भरतीसाठी सराव करणाऱ्या या युवकांच्या पंखात बळ भरणे आवश्यक आहे.मग ते नोकऱ्या असोत किंवा उद्योग असोत.
हे युवकच देशाचे उज्वल भविष्य घडवणार आहेत.
--------------------------

