10 कोटी नशा मुक्त महा अभियान. प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा सामाजिक संकल्प.

Kolhapur news
By -

 

                  





                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           माऊंट अबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयामार्फत दहा कोटी पर्यंत नशा मुक्ती  महाअभियान सुरु करण्यात आले आहे.


      देशातील युवकांना नशामुक्त करून त्यांना सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभावे हा या महा अभियानाचा मुख्य उद्देश आहे साधारणपणे 15 ते 30 वयोगटातील युवक हे व्यसनाधीन बनत जातात.युवक हे या देशाचे भविष्य आहे.दादी प्रकाश मणी जी यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ हा विधायक असा सामाजिक उपक्रम विद्यालयाने व पर्यायाने सर्व राज्याच्या प्रशासनाने हाती घेतला आहे.


    ऐन उमेदीच्या वयात जेंव्हा युवक व्यसनाधीन होतात तेंव्हा घरा घरात कौटुंबिक कलह सुरु होतात, आर्थिक स्थिती कोलमडते, अल्प वयात मृत्यू सारख्या संकटाना सामोरे जावे लागते. केवळ नशेमुळे देशात 30 लाख मृत्यू होत असल्याचे एका सर्वे मध्ये आढळून आलेआहे.विश्वविद्यालयाने 6 ते 20 ऑगस्ट पर्यँत विविध ठिकाणच्या शाळांमधून ही मोहीम हाती घेतली आहे.


     विदयार्थ्यांतून घडणारा भावी युवक तणाव मुक्त आणि सुसंस्कारीत व्हावा हा ध्यासच या अभियानातून घेण्यात आला आहे.ब्रम्हा कुमारीच्या मुरगूड केंद्रात बीके लता बहेनजी यांच्या अध्यक्षतेखाली  व मार्गदर्शनाने अभियानाची सुरुवात झाली.


  मुख्य अतिथी म्हणून माजी प्राचार्य व्ही आर भोसले, माजी प्राचार्य जी के भोसले, बाळासाहेब लोकरे हे उपस्थित होते.केंद्राच्या सर्व साधकांकडून बीके लक्ष्मी बहेनजी यांनी शपथ म्हणवून घेतली.विश्व विदयालयच्या मेडिकल विंग मार्फत हा स्तुत्य उपक्रम देशभर राबवला जात आहे.


              ------------------------------