मुरगूड मध्ये मराठा मॅट्रिमोनी चे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन. सर्व समाज बांधवाना लाभ. उद्योजक ऋषिकेश बोरगावे यांचा विधायक उपक्रम.

Kolhapur news
By -

 

              


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   



अलीकडे उपवर वधु वर यांचे विवाह जुळवणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. सुशिक्षित युवक युवती करिअर च्या मागे लागलेले असतात. मुलांचे विवाह योग्य वयात होणे ही एक कौटुंबिक जबाबदारी मानली जाते.




     विवाह जुळवणारी संस्था  मोठमोठ्या जाहिराती देते. वधु वर संशोधनाची फी आगाऊ घेतली जाते. पत्रिका फोटो एकमेकांना पाठवले जातात. काही ठिकाणी खाजगी एजंट देखील विवाह जोडणीचे काम करत असतात. स्थळे सुचवणे आणि फी वसूल करणे एवढेच त्यांचे काम असते. पुढचा संवाद, संपर्क ज्याचा त्यांनी पहायचा. त्यामुळे विवाह जुळणी हा एक अर्थार्जनाचा व्यवसाय बनला आहे.



     मुरगूड येथील प्रथितयश उद्योजक ऋषिकेश बोरगावे यांनी यावर एक तोडगा काढला असून मराठी मॅट्रिमोनी नावाची विवाह जुळणी संस्था स्थापन केली आहे. स्थळांची पूर्ण माहिती कुंडली पत्रिका यासह गरजूंना माहिती पुरवली जाते व त्यांना समोरासमोर बोलावले जाते. मराठा ब्राह्मण जैन ओबीसी सर्व प्रकारच्या वधू-वरांची एकत्र भेट घडवून आणण्यात येते. विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात हे केले जाते. या विधायक सामाजिक उपक्रमात त्यांची पत्नी सौ.  सोनिया  व मुलगा आदित्य हे सुद्धा मदत करत असतात.



    मुरगूड सारख्या छोट्या शहरात अशा मॅट्रिमोनी संस्थेची गरज होती. मुरगूडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील यांनी या मॅट्रिमोनीचे उदघाट्न केले.



  मुरगूड  विद्यालय व जुनिअर कॉलेज चे प्राचार्य एस. पी. पाटील यांनी आपल्या स्वागत पर भाषणात बोरगावे कुटुंबियांचे कौतुक केले व अशा संस्थेचे सामाजिक महत्व विशद केले. कार्यक्रमास  पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव कानकेकर,पत्रकार प्रा. रवींद्र शिंदे, राजेंद्र चव्हाण,दिलीप निकम, ऍड.सुधीर सावर्डेकर, सॊ. अनिता जाधव,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक विवेक गवळी यांनी केले,दिग्विजय देसाई व आर्यन जाधव यांनी सूत्र संचालन केले.प्रदीप कोळी यांनी आभार मानले.



                     ------------------------