कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा घटक नसून समाजाच्या आणि राष्ट्राच्या भविष्याची जडणघडण करणारा शिल्पकार आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान, नव्या अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन स्वीकारून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे. शिक्षकांच्या योगदानामुळेच समाजाची वैचारिक आणि शैक्षणिक पिढी घडत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडणारे शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिक्षण क्षेत्राशी सातत्याने जोडलेले नेतृत्व विधानपरिषदेत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आणि केलेले संघटनात्मक कार्य उल्लेखनीय आहे. आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात त्यांचे नेतृत्व निश्चितच प्रभावी ठरेल म्हणूनच कौस्तुभ गावडे यांच्या शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री आणि पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, जिल्हा/शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे उपयोजन शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा समजून घेऊन आधुनिक अध्यापन पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. शिक्षकांवरील अन्याय वाढतो आहे, यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे अभ्यासू, होतकरु, धाडसी, तरुण तडफदार नेतृत्व कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आमदार म्हणून विधानपरिषदेत पाठविण्याची कामगिरी आपणा सर्वांना करावयाची आहे, असे मत मांडले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली. देश घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे असते. आजच्या काळात शिक्षकांवर विविध मार्गानी अन्याय होत आहे. तो कमी केल्याशिवाय मी थांबणार नाही.
शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या सेवेशी संबंधित प्रश्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक धोरणे यासाठी सातत्याने आवाज उठविणे ही माझी भूमिका आहे. शिक्षकांनी व्यक्त केलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक आणि लोकशाही मार्गाने सातत्याने लढा देत राहू. सन 2005 अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांच्यावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द करणे, TET सक्ती रद्द करणे, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया वर्षभर नियमितपणे सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणे, शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे, अनुदानास पात्र संस्था व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करणे, महिलांच्या रजःस्त्राव काळात गरजेनुसार विशेष रजा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणे असे शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न पुढील सहा वर्षात सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे. त्यामुळे सर्व शिक्षक माझ्या पाठीशी ठाम उभे असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले.
आपल्या मनोगतात महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जी. के. थोरात यांनी, शिक्षकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व आजच्या काळाची गरज आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या कार्यक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज असून शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी कौस्तुभगावडे यांच्या सारखे संघटित नेतृत्व आवश्यक आहे, असे मत मांडले.
आपल्या मनोगतात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यासमितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे यांनी, शिक्षकांचा आवाज विधानपरिषदेत बुलंद करण्यासाठी अभ्यासू, संघर्षशील आणि शिक्षकांशी नाळ जोडलेले नेतृत्व पुढे आले पाहिजे. कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतली असून त्यांचे संघटनात्मक कार्य आश्वासक आहे. यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे कौस्तुभ गावडे यांना आमदार म्हणून विधान परिषदेत पाठविण्यासाठी सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन केले.
यावेळी टीडीएफ चे प्रदेश सचिव के. एस. ढोमसे, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकदूत पुरस्कार कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, जयकुमार मल्हार देसाई, डॉ. सतिश घाळी, डॉ. के. एस. चौगुले यांना जीवनगौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. तर अनिल ईश्वरा चव्हाण यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार देण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशोक चराटी, जयंत प्रदीप पाटील, शंकरराव बापूसो पाटील, उदय बाबुराव धारवाडे, उमेश नामदेवराव भोईटे, तमास सायर पिंटो, जी.एस. पाटील, आनंदा गुंडू पाटील, शमशुद्दीन नुरुद्दीन पटेल, अशोकराव मारुती फराकटे, एन. आर. भोसले, एम.एम. तुपारे या 14 आदर्श संस्थाचालकांचा तसेच सुनिल मारुती चव्हाण, जयसिंग ज्ञानदेव पाटील, शंकर ईश्वरा येजरे, बंडू बाबू नाईक, सुधीर पांडुरंग कांबळे, दादासाहेब आप्पा पाटील, साताप्पा कृष्णा पाटील, विक्रमसिंह विजयसिंह मोरे, संजय लक्ष्मण चिगरे, एन. आर. भोसले, वंदना बाजीराव पाटील, मनिषा सरदार पाटील, रणधीर दत्तात्रय कांबळे, आनंदराज यशवंत पाटील, दीपक बापूसो पाटील, पदमीनी अशोक माने, प्रसन्नकुमार माधव जोशी या 17 मुख्याध्यापकांचा आणि प्रशांत सुभाष गुरव, किरण सुभाष चव्हाण, उमाराणी संजय जाधव, रुपेश रामचंद्र गोविलकर, राजेंद्र गणपतराव ढेरे, जयश्री राजेश देसाई, सुनिल महादेव तांबेकर, शुभांगी संतोष भोसले, धनाजी बजरंग कदम, परशराम मारुती ओऊळकर, प्रशांत शिवाजी मगदूम, रुपाली महेश वणकुद्रे, चंद्रकांत आनंदा गुरव, राजाराम विठू करडे, विद्या सागर सावर्डेकर, श्रीधर दादासो खोराटे, राजाराम गुंडा पाटील, गीतांजली रविंद्र पाटील, रमेश विठ्ठल पाटील, बाळासो मारुती कोळी, वर्धमान श्रीपाल वाडकर, विद्या किरण शेवाळे, वसंत विश्वास पाटील, संभाजी राजाराम उबारे, संजय शंकर पाटील, बाळासाहेब बाबासाहेब मगदूम, प्रज्ञा दत्तात्रय जाधव, शरयू मच्छिंद्र शेडगे, मानसिंग आनंदराव पाटील, डॉ प्रकाश तुकाराम वाघमारे, क्रांती गजानन माजले, सरदार कृष्णात पाटील, प्रकाश ज्ञानदेव वाकरेकर, प्रकाश तुकाराम भोसले, राजन गोविंद देसाई, सुहास भैरवनाथ पाटील, अल्ताफ अहमद अब्दुलगफार देसाई, संज्योती विकास समुद्रे, भगवान मारुती फडतारे, अलका प्रमोद गायकवाड, राजेंद्र महादेव कुंभार, रमजान दस्तगिर मुल्ला, नंदकुमार शंकर पोवार, अरविंद पिराजी बने, रोहित विजय पाटील, डॉ अमर बापूसो पाटील, सतिश शामराव राजू शंकर बनसोडे, मनिषा उदय डांगे या 49 शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या पुरस्कारांमुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना अधिक जोमाने आणि प्रेरणेने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी सत्कारमूर्तीनी व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्थेच्या प्रार्थनेने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी सुमधूर आवाजात भक्तीगीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत टीडीएफ पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी केले. आभार पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश खोत यांनी मानले, तर सुत्रसंचालन प्रा. अशोक पाटील यांनी केले. यावेळी बी. डी. पाटील, बी. एस. खामकर, संजय चोरमारे, आजीव सेवक भूपाल कुंभार, अजित देसाई, राहुल कुंभार, अशोक पलंगे हे उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------







