कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"मला तुकाराम मुंडे व्हायचे आहे, शाळेच्या या चार भिंतीत माझा जीव कोंडतोय." हे उद्गार आहेत एका अनुदानित माध्यमिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचे.
त्याचे नाव आहे योगेश जाधव.
नावाप्रमाणे शिक्षण क्षेत्रातला हा योगी असावा असे वाटते.योगेश जाधव यांचे गाव गंगापूर तालुका भुदरगड. घरी शेतीचा व्यवसाय. कुदळ खोरे कोळपा आणि शेणाच्या बुट्ट्या हेच त्यांचे सकाळचे सवंगडी. वय होत चाललेल्या आईवडिलांना मदत करायची. दहा वाजता जेवणाचा डबा उचलायचा आणि शाळा गाठायची.योगेश बिएस्सी बी एड फर्स्टक्लास. योगेश ची धाकटी बहीण मीनल. तीही हुशार. एम एस सी फर्स्टक्लास (गोल्ड मेडल )पर्यंत शिक्षण.तरीही गोठ्यातले फावडे उचलायला तिला कधि कमिपणा वाटला नाही.
बहीण भावांनी घरातच एक गुरुकुलम सजवले होते. स्वाव लंबन हा त्यांचा पिंड होता.दोघेही सरकारी नोकरीच्या शोधात होते.मुरगूडच्या न्यू इंग्लिश मेडीयम मध्ये ते दोघेही रुजू झाले. अल्पा वधीत विद्यार्थ्यांत प्रिय झाले. विनाअनुदानित खाजगी शाळेत शिक्षण दर्जेदार असले तरी वेतन सरकारी आयोगाप्रमाणे मिळत नसते.दोघेही सरकारी नोकरीच्या शोधात होते , तो दिवस उजाडला. योगेश ला पवित्र पोर्टल मधून एका अनुदानीत शाळेत नोकरी मिळाली. मीनल एका महाविद्यालयात लेक्चरर झाली. अल्पावधीत लग्नही झालं.सरकारी नोकरीतला पती मिळाला.
योगेश ला अनुदानित शाळेत नोकरी मिळाली असली तरी तो सरकारी नोकरीच्या शोधात होता.पवित्र पोर्टलमधून त्याला तशी एक संधी चालून आली.अगदी सकाळी सकाळी योगेश चा फोन आला.
"मला जिल्हा परिषदेकडे पवित्र पोर्टल मधून संधी मिळते आहे."
छान, पण वेतन दोन्ही कडे सारखेच. शाळेतली नोकरी स्थिर स्वरूपाची आहे. जि. प. ला सारखं फिरावं लागणार.
चालेल. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे असे मला वाटते.जि. प. कडे गेल्यास शिक्षणातील कांही विकासात्मक प्रयोग करता येतील. शिवाय केवळ वेतानासाठी नोकरीं किंवा नोकरीसाठी नोकरी ही संकल्पना बदलावी लागेल.
भरपूर वेतन मिळत असल्याने त्यातून जोड धंदे उभे करण्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे असे दिसते. त्यामुळे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे असे माझे मत आहे.शिक्षण क्षेत्रात सुद्धा आता तुकाराम मुंडे सारखे अधिकारी हवे आहेत असे मला वाटते.तुकाराम मुंडे होणे सोपे नाही.असा अधिकारी होणे म्हणजे फुटबॉलच्या मैदानातला चेंडूच म्हणावे लागेल. सगळे चेंडू गोल करतीलच असे नाही. सत्तेच्या मस्तीत खेळणाऱ्या कांही राजकीय खेळाडुंची किक या 'मेस्सी 'ला बाहेरचा रस्ता सुद्धा दाखवू शकते.चालेल. मेस्सी, रोनाल्डो यांना जे प्रेम कोट्यावधी क्रीडा प्रेमिकडून मिळाले आहे ते तर कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
व्वा योगेश. खुप चांगले ध्येय आहे. एक नव्हे अनेक मुंडे या क्षेत्रात निर्माण व्हायला हवेत. खाजगी अनुदानित शाळेत केवळ पवित्र पोर्टल वर नोकरी मिळाली नसेल. तेथे कांही आर्थिक कर्ज झाले असेल. प्रश्न पैशांचा आहे. तुला टॉस उडवला पाहिजे. सर, तुम्हीं शोले चित्रपट पाहिला असेल. अमिताभ कडे टॉस चे एक नाणे होते. नाण्याच्या दोन्ही बाजूस एकच सिंह होता.म्हणून नेहमी तोच टॉस जिंकायचा.मला ही या क्षेत्रातला असा टॉस जिंकायचा आहे. कर्ज आणि पैसे यांचा विचार करायचा नाही. मी तुकाराम मुंडे यांचा आदर्श ठेऊनच या क्षेत्रात उत्तरेन. मला 'मुंडे' होता आले नाही तरी त्यातला 'तुकाराम ' व्हायचे आहे.शिक्षण क्षेत्रातला 'विठ्ठल' शोधायचा आहे. छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहेत.
व्वा , तुला अनंत शुभेच्छा.
-----------------------

