कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गोकुळ बचाव साठी मी आणि संजयदादा 2019 ला ही लढलो.या पुढेही लढत राहूअसे प्रतिपादन विधानपरिषद आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मुरगूड येथील दूध उत्पादक सभासदांच्या बैठकीत काढले. यावेळी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे नेते वीरेंद्र मंडलिक व गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील उपस्थित होते.
सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात गोकुळ बचाव साठी' 'आमचं ठरलंय 'या सुपरिचित घोषणेची (टॅग )पुन्हा एकदा आठवण करून दिली. स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणीचा एक किस्सा सुद्धा त्यांनी सांगितला. पराभवाने कधी खचून जायचे नाही असे ते सांगत असत. त्यांनी आम्हांला सतत ऊर्जा देण्याचे काम केले आहे.
गोकुळ मध्ये सद्या स्थिर प्रशासनाची गरज आहे असे सांगून ते म्हणाले की दूध उत्पादकांना एक रुपयातून आतापर्यंत 86 पैसे मिळत होते त्या ऐवजी 90 पैसे कसे मिळतील यासाठी निश्चित प्रयत्न करू.
मुरगूडच्या साई आखाड्याची महिला मल्ल अमृता पुजारी हिची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा सत्कार करण्यात आला व तिला सतेज पाटील यांनी 50 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याची घोषणा केली.यावेळी अन्य कांही मुलांचाही सत्कार करण्यात आला.
----------------------------



