कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अन्यायकारक संच मान्यता रद्द करण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालयावर विराट मोर्चा

Kolhapur news
By -

 

         



               कोल्हापूर  न्यूज नेटवर्क



 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अन्यायकारक संच मान्यता रद्द करण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालय येथे ४ सप्टेंबर रोजी विराट मोर्चा व धरणे आंदोलन करून विविध १५ मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे यांना देण्यात आले.अशी माहिती प्रसिद्धीस प्रा.विजय मेटकरी यांनी दिली.


       या आंदोलनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या  ३० विद्यार्थ्यांची सायन्सची प्रॅक्टिकल बॅच पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची करावी. वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाची तासिका पूर्वीप्रमाणे ४५ मिनिटाची करावी.पर्यावरण शिक्षक व शारीरिक शिक्षक यांचे तास इतर शिक्षकांना देऊ नये. या शिक्षकांना सेवा शाश्वती द्यावी.अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पदी उन्नयन करणे.दोन विषयाचा कार्यभार एकत्र असणाऱ्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे मान्यता देण्यात यावी.वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयास ४० मिनिटाची तासिका बनल्यास तुकडीची विद्यार्थी संख्या ही १२० ऐवजी ६० प्रमाणे गणली जावी. आय.टी विषय अनुदानित करून शिक्षकांना वेतन द्यावे.यासह विविध १५ मागण्यांचे निवेदन  शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे  यांना देण्यात आले.


      यावेळी महासंघाच्या आंदोलनास 

आमदार जयंत आसगावकर,माजी आमदार भगवानराव साळुंखे,माजीआमदार दत्तात्रय सावंत,माजी आमदार सुधीर तांबे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, पंढरपूरच्या स्वीरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बब्रुवान  रोंगे,शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव खांडेकर, मराठवाड्याचे नरेंद्र काळे. शिक्षक सेनेचे सुनील भाऊ जगताप, पुणे वाडिया कॉलेजचे सानप, यासह आजी-माजी पदाधिकारी व विविध संघटनांचे अध्यक्ष आणि संस्थाचालक यांनी मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला.


      यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष. प्रा. डॉ. संजय शिंदे, मार्गदर्शक मुकुंद आंधळकर,कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब बागडी, सचिवप्रा. बी एस पाटील,उपाध्यक्ष प्रा.विजय मेटकरी,परीक्षा विभाग सचिव प्रा. पी.बी.रक्ताडे,प्रा.बी.आर.पाटील, प्रा. विनायक चव्हाण,उपप्राचार्य, प्रा.दिलीप संकपाळ, प्रा.अशोक चव्हाण, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा.रत्नदीप पवार, प्रा. राहुलचौगले, प्रा.दिनेश चिकुर्डे,प्रा. प्रवीण रसाळे, प्रा. मेघदूत पाटील, प्रा. एच बी जवळे, प्राशिवाजी अंगज, प्रा.विशाल कोकरे,प्रा. अनिल पवार,प्रा. संदीप कोळी,प्रा. हेमंत गव्हाणे,यासह कोल्हापूर जिल्ह्यातून  २५० पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून ५ooo पेक्षा अधिक शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.मोर्चासाठी आलेल्या पाच हजार शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था वाडिया कॉलेजच्या वतीने करण्यात आली.

     

पुणे येथे  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अन्यायकारक संच मान्यता रद्द करण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालय येथे धरणे आंदोलन करतांना शिक्षक व संघटना पदाधिकारी


                     ----------------------