५ सप्टेंबर शिक्षक दिनी जुनी पेन्शन समन्वय संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ , मुख्याध्यापक संघ व संस्थाचालक संघाचा पाठींबा

Kolhapur news
By -

 

            


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क



१ नोव्हेबंर २००५ पूर्वी नियुक्त जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने ५ सप्टेबंर शिक्षक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्याचा निर्धार केला असून या मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व संस्थाचालक संघाने जाहिर पाठींबा व्यक्त केला आहे. मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शन शिक्षक आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचे लाभले.


      १ नोव्हेबंर २००५ पूर्वी नियुक्त विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत, शाळा व तुकडीवरील, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती ही १ नोव्हेबंर २००५ पूर्वीची असूनही सदर कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना देय असूनही लाभ दिला नाही. त्यामुळे यामधील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर कोणत्याच निवृत्त वेतनाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील अनेकांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. राज्यात  २६ हजार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत.


     त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जुन्या पेन्शन बाबत लढणाऱ्या सर्व पेन्शन पिढीत बांधवांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन १नोव्हेबंर २००५ पूर्वी नियुक्त जुनी पेन्शन समन्वय संघाची स्थापना केली आहे. या संघाच्या वतीने राज्यांमध्ये शिक्षक दिनी ५ सप्टेबंर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात ५ सप्टेबंर शिक्षक दिनी शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या मोर्चाची सुरुवात सकाळी १२ वाजता दसरा चौक येथून होऊन व्हीनस कॉर्नर बसंत-बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. या मोर्चास कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.


         

या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील १७५० शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्याकुटुंबासह उपस्थित राहणार आहेत.

    

   या बैठकीस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, बी.जी. बोराडे, बाबासाहेब पाटील, डॉ. डी. एस. घुगरे, सुधाकर निर्मळे, सुरेश संकपाळ, मिलींद पांगिरेकर, शिवाजी माळकर, उदय पाटील, एन. आर. भोसले, व्ही. एम. पाटील, रवींद्र मोरे, जयसिंग पोवार,श्रीधर गोंधळी,के.के.पाटील, बाजीराव साळवी, एन. के.ताम्हणकर, एम. जी. पाटील, एच. वाय. शिंदे, संदीप पाथरे आदी विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर : शैक्षणिक व्यासपीठ बैठकीत बोलतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील, राहूल पवार, आर वाय पाटील आदी मान्यवर.



              -------------------------