कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विद्या मंदिर कुरणी ता. कागल येथील प्राथमिक शाळेस पांडुरंग गुरव (देव मामा )यांनी एक लाखाची देणगी दिली. या देणगीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले.
ग्रामस्थ,विदयार्थी व शिक्षक यांनी देणगीदारांचे भव्य स्वागत केले आणि त्यांचा यथोचित सत्कार केला. 'नही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते 'म्हणजे ज्ञाना सारखे पवित्र असे दुसरे कांही नाही. असे भगवत गितेत म्हंटले आहे.पांडुरंग पुजारी यांनी गितेतील हा संदेश आपल्या दातृत्वातून प्रत्यक्ष अमलात आणला आहे.सर्वसामान्यांच्या दारापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना देणगी देऊन त्यांनी एक आदर्श उभा केला आहे.
ग्रामस्थ व शिक्षकांना देखील या देणगीचे खूप कौतुक वाटले आणि त्यांनी त्यांचा उत्साहाने सत्कार केला.पांडुरंग गुरव देव मामा यांनी भडगाव, मुदाळ, आदमापूर येथील प्राथमिक शाळांना सुद्धा यापूर्वी अशीच देणगी दिली आहे. सत्कार समारंभास ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
-------------------------------

