गोकुळ ची अध्यक्ष निवड : ना. मुश्रीफ आणि आम. बंटी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार

Kolhapur news
By -

 


 कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


 

 ना. मुश्रीफ आणि आम. बंटी पाटील या दोघांच्या नेतृत्वाची कसोटी गोकुळ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लागणार आहे. '25:0,'  "गोकुळ चे बाप आम्हीच." वगैरे  दर्पयुक्त बार फुसके ठरले आहेत.दूध उत्पदकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठराव धारकांनी यावेळी पहिल्यांदाच कोणत्याही अमिषांना बळी न पडता अगदी सचोटीने मतदान केले आहे.आणि आम.बंटी यांच्या पारड्यात 13 आणि महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या ना.मुश्रीफ यांच्या पारड्यात 12 संचालक पदांचा भार टाकला आहे.


नियतीचा खेळ सुद्धा कसा विचित्र  असतो पहा. बंटीना नियतीने 13 वरच थोपवले आहे.

" मी बी बावड्याचा पाटील हाय "

या अभिमानाला तिने लगाम घातला आहे.

   अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिने या दोन धुरंदर नेत्यांना पुन्हा समोरासमोर समोर आणले आहे.कोडे थोडे अवघड आहे.



मोबाईल मधील कॅल्क्युलेटर वर जरा बोटे नाचवा म्हणजे लक्षात येईल. 25 संचालक आहेत. कोरम साठी निम्म्याहून अधिक एक इतके संचालक लागणार आहेत. निम्मे म्हणजे 12.5.आणि अधिक एक म्हणजे 13.5.असे हे गणित आहे.ते सांगते की अध्यक्ष पदासाठी 13.5 म्हणजेच किमान 14 संचालकांचा कोरम हवा.याचा अर्थ ना. मुश्रीफ यांचे कडील एक संचालक आम. बंटीना देणे किंवा बंटी यांचे कडील दोन मते घेऊन युतीचा अध्यक्ष बनवणे. म्हणजे 'अशी ही बनवाबनवी ' या नाटकाचा  पाहिला अंक सुरू करणे.



   येथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. उत्पादकांनीं  सचोटीने मतदान करून भल्या भल्यांना घरी बसवले आहे आणि दोन धुरंदर नेत्यांना समोर आणले आहे. आता डावपेच नाहीत तर सॅल्यूट ची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.सर्व 25 संचालक हजर राहिले तर मतदान होईल व बहुमताने बंटी याचा अध्यक्ष निवडून येईल. नामदारांनी आपले 12 संचालक गैरहजर ठेवले तर तांत्रिक पेच निर्माण होईल.गोकुळ चे मूळ संस्थापक स्व.आनंदराव पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांचे नाव आम.बंटी यांनी अध्यक्ष पदासाठी आधीच जाहीर करून तमाम उत्पादकांची भावनिक साथ मिळविली आहे.मागच्या वेळेस आपल्याला अध्यक्षपद निश्चित मिळणार म्हणून त्यांनी दारात स्वागताचा मंडप सुद्धा घातला होता. पण त्यांना चकवा देऊन नावीद मुश्रीफ यांना अध्यक्षपद दिले गेले. महायुतीची ही पहिली कब्बड्डी एंट्री महागात पडली. तिच पाहिली चुक ठरली. आणि संघ सामना हरला. उत्पादकांची सचोटी येथे कामी आली.तिला सॅल्यूट करून नामदारांनी सुद्धा मोठया मनाने उत्पादकांचा सन्मान राखल्यास गोकुळ च्या राजकारणात एक नवीन पायंडा पडू शकेल.



  गोकुळकडे आता पितृत्वाच्या नव्हे तर मातृत्वाच्या भावनेतून पाहिले पाहिजे असा संकेत नियतीनेच घालून दिला आहे.दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाची नाळ तळागाळातल्या जनसमान्यांपर्यंत जोडली गेली आहे.ते लादलेले नेते नाहीत. एक गोष्ट मात्र नक्की की उत्पादकांचे हित लक्षात घेऊनच दोन्हीकडच्या नेत्यांनी अध्यक्ष निवडीपूर्वीच एकमेकांवर अटी घालून घेतल्या पाहिजेत.नावीद हरले म्हणून त्याचा बदला घेण्याची ही वेळ नाही. केडीसी बँक निवडणूक तोंडावर आहे. कागल मधून अमरीशसिंह घाटगे व वीरेंद्रसिंह मंडलिक हे दोन संचालक तुमच्या पॅनल मध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे.



  स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्याच शब्दांत सांगायचे तर आंबा झाडावरच पिकावा लागतो.गोकुळ साठी नावीदना जनतेतून यायला हवे असा कौल दूध उत्पदकांनी दिला आहे. 



    आता गोकुळ च्या अध्यक्षपदाची निवडणूक 29 ऑक्टोबर ला होणार आहे.येथेच ना.मुश्रीफ आणि आम. बंटी यांच्या यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.


      -----------------------------