शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान : हेरलेत शॉर्ट सर्किटने १० लाखांचा ऊस जळून खाक

Kolhapur news
By -

 

                  


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


                       हेरले / प्रतिनिधी


हेरले (ता. हातकणंगले) येथील विलास वसंतराव नाईक यांच्या गट नंबर ५८१मध्ये विजेचा खांब आहे. शुक्रवारी दि. १६ रोजी सायंकाळी सात वाजता विजेची तार तुटून एकमेकास चिटकली त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने शंभर गुंठे ऊस पेटून जळाला. या जळीतामध्ये अंदाजे नऊ ते दहा लाखाचे नुकसान झाले.


     या शेतीतील ऊसाची नोंद जवाहर साखर कारखाना येथे झालेलीआहे. काही दिवसात ऊस तोड येणार होती. या शंभर गुंठे शेतीमध्ये अंदाजे  ऊस१८० ते २०० टन होणार होता. तरी अंदाजे ९ ते १० लाख रुपयाचे या शॉर्टसर्किट जळीतामुळे नुकसान झाले आहे.  शनिवारी सकाळी आठ वाजता  वाटेकरी दस्तगीर खतीब यांनी विलास नाईक यांना ही घडलेली घटना सांगितली. तसेच प्रसिद्धीस माहिती ही वाटेकरी दस्तगीर खतीब यांनी दिली.


     विज वितरण कर्मचारी तय्यब मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या घटनेची माहिती शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली असता ऊस जळाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ फिजा काढून या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. ते सोमवारी पंचनामा करून अहवाल मुख्य कार्यालयाकडे पाठवतील असे त्यांनी सांगितले.


                       ---------------------