२० वर्षांच्या अथक संघर्षातून दीपिका चौगुले यांनी पवित्र पोर्टल जिंकले. सिंधुदुर्ग ला निवड.

Kolhapur news
By -

 


                  

      


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


२० वर्षाच्या अथक परिश्रमातून न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल च्या दीपिका चौगुले पवित्र पोर्टल सिंधुदुर्गला  निवड झाली आहे. त्यांच्या संघर्षाचा हा शब्द बद्ध आलेख.२० वर्षे झाली असतील या घटनेला. एम. डी.रावण म्हणजे मनस्वी कलाकार. उत्तम संघटक, भगतसिंग तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. आमचे मित्र. त्यांचा सकाळीच फोन आला.


मुरगूडला इंग्लिश मीडियम स्कूलची गरज होती. आपण सुरू केले, बरं झालं. आमच्याकडे हुशार कॅन्डीडेट आहे. एसएससी ला मुरगूड सेंटरला प्रथम आलेली मुलगी आहे. आपल्या कडे शिक्षिकेची जागा आहे. तिला एक संधी द्या.


    ठीक आहे. द्या पाठवून.दीपिका नलगे शाळेत हजर झाल्या. कोणत्या वर्गावर शिकवणार? कोणत्याही. इंग्रजीत शिकवावे लागेल.हॊ चालेल. विषय? गणित,सायन्स, अरे व्वा.आजपासून सुरू करा. दीपिका मॅडम सुंदर शिकवायच्या. विदयार्थी खूष, पालक खूष. हसरा चेहरा  पण अंतरी एखादी जिद्द दडलेली असावी.पण त्यांनी ती कधी बोलून दाखवली नाही.त्यांचे बुद्धी वैभव आणि सरकारी सेवेची संधी  यांचं युद्ध आत कुठं तरी सुरू असावं असं वाटायचं. या युद्धात बुद्धिवैभय हरायचं. कधी दोन गुणांनी तर कधि तीन गुंणांनी. त्यात बँकेच्या पण परीक्षा असायच्या. नुसता लपंडाव.


    एका वळणावर त्यांचा विवाह झाला. न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये त्या छान रमल्या. वेतन पुरेसं नव्हतं पण मानसिक स्वास्थ्य बरंचस होतं. मुरगूडला आईच्या घरी म्हणजे माहेरात 10 वी च्या ट्युशन्स पण सुरू केल्या. सासर अवघ्या दोन किलोमीटरवर. संध्याकाळी फक्त मुक्कामाला जायच्या.


    आतली टोचणी मात्र सुरूच होती. मनःशांती साठी एकट्याच कधी कधी सर पिराजी तलावाच्या कठड्यावर जाऊन बसायच्या.तो विस्तीर्ण जलाशय जणू दीपिकाशी बोलायचा . पाऊस आला की  काठोकाठ भरून जातो.  आटत मात्र कधीच नाही.


निसर्ग सुद्धा प्रेरणा देत होता. त्यात कोरोना चे तांडव सुरू झाले. वर्क फ्रॉम होम.दीपिकाने तेवढ्यात ऑनलाईन डी एड करून घेतले. ज्ञानदान हा पेशा नाही तर सेवेचा वसा आहे आणि तो मी निभावणार आहे असा निर्धार तिने मनोमन केला.


 दीपिका म्हणजे शांत पणे देव्हाऱ्यात तेवत रहाणारी छोटीशी ज्योत.  विझणं नाही की फडफडणं नाही.या ज्योतीत अनेक अगरबत्या पेटल्या आणि सुगंधित झाल्या.अनेक पाखरं आली आणि भुर्रकन उडून गेली. उंच फ़ांद्यावर जाऊन बसली. दीपिका तेवतच होती. अंधाराशी लढत होती.


     बुद्धी वैभव स्वस्थ बसू देत नव्हतं. TET,पवित्र पोर्टल यांचं हुलकवण्या देणं सुरूच होतं.दरम्यान सासरच्या गावी ज्ञानदीप या शाळेत त्यांनी ज्ञानदानाचे काम सुरु केले.तेथे शिष्यवृत्तीच्या पताका फडकवण्यात मोठे योगदान दिले.


   आता स्वतःच्या मुलांच्यावर सुद्धा आता लक्ष केंद्रित करायला हवं होतं. मुलं ही चमकत होती. दीपिका मात्र अजूनही तेवत होती. आणि तो दिवस आला पोर्टल मध्ये उत्तीर्ण झाल्याचे ऑनलाईन कळले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शाळेत हजर व्हायची सरकारी नोकरी मिळाली. आता सातवा वेतन आयोग लागू होणार.आता दीप उजळला होता.


तेजोवलंय पसरत जाईल. बुद्धिवंतांना तेथे अनेक संधी उपलब्ध होतील.शिक्षण खात्यातील स्पर्धा परीक्षा देता येतील. आता फिल्डिंग संपले आहे. बॅटिंग सुरू झाले आहे. चौकार सिक्सर मारायचे आहेत. समोर महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आहे. जिद्द आणि संघर्षाचे दुसरे नाव. अंधार लपून छपून पहात होता. दीप उजळत होता. तेजोवलंय वाढत चालले होते.आता येथे थांबायचे नाही. म्हणून तोही चाचपडत  निघून गेला.


                 -------------------------