कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील संदीप वड्ड यांची भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या कागल तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे.
शेत जमीन, घर,निवारा असे कांही नसलेल्या आणि हातावरचे पोट असलेल्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना उपजीविकेसाठी कामधंदा शोधत फिरण्याची वेळ येते. त्यांच्या संघटनाची गरज होती त्याकरिता मुरगूड येथील संदीप वड्ड या धडाडीच्या पण अत्यंत नम्र अशा युवकाची निवड भारतीय जनता पक्षाने केली आहे.त्यांची या आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या जमातीच्या कष्टकरी लोकांचे संघटन करून त्यांच्या समस्या समजून घेणे. उपजीविके साठी काम उपलब्ध करून देणे, मागासवरर्गीय समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे अशी कामे त्यांना करावयाची आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक,भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे,शाहू ग्रुप चे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, प्रवीणसिंह पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, ऍड.अमर पाटील, तालुका सरचिटणीस मयूर सावर्डेकर, शहर अध्यक्ष पृथ्वीराज कदम, आणि त्यांचे अनेक सहयोगी कार्यकर्ते यांनी त्यांच्या निवडीसाठी योगदान दिले आहे.
भटक्या व विमुक्त लोकांच्या साठी एखादे स्वतंत्र कार्यालय उभे करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
------------------------


