कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मागील दोन वर्षापूर्वी (2022-23 पर्यंत) गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने (CL-2, CL-9, FL-BR-2) बंद ठेवण्याचा आदेश आपल्या कार्यालयातून काढण्यात येत होता. त्यामुळे मिरवणुका अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडत होत्या.परंतु सद्यस्थितीत गेल्या दोन वर्षापासून हा आदेश काढला जात नाही. त्यामुळे आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी अनेक ठिकाणी दारू पिऊन तरुणांकडून मिरवणुकीत गोंधळ, भांडणे, डान्स करते वेळी अश्लील वर्तन अशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
यामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. गणेशोत्सव उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठा आणि श्रद्धेचा सण आहे त्यामुळे येत्या सार्वजनिक गणपती आगमनाच्या दिवशी तसेच घराचे गणपती जाणारी व मंडळांचे गणपती जाणाऱ्या अनंत चतुर्दशी (विसर्जन) दिवशी बेळगाव जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने, बार आणि बिअर शॉपी बंद ठेवण्याचा (Dry Day) आदेश काढावा.या दिवशी दारू पिऊन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस खात्यास देऊन जनतेच्या धार्मिक भावनेचा आदर करावा अशा मागणीचे निवेदन फोर जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने निपाणीचे सीपीआय बी .एस .तळवार यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती बेळगावचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आणि कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक यांना पाठवल्या आहेत .
यावेळी फोर जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशन संघटनेचे मोरेश्वर थोरवत , संतोष कुर्ले , योगेश पोतदार , शेखर पकाले , योगेश कांबळे उपस्थित होते.
-----------------------------

