जोतिर्लिंग विद्यामंदिरची यशाची परंपरा कायम

Kolhapur news
By -

 

          


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


जिल्हा शासकीय  शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत व शासकीय के.टी.एस.परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा यथोचित सत्कार ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन मा. सभापती शीला सोनुले,  प्रशासन अधिकारी जयश्री जाधव व  नगरसेविका डॉ. सुषमा जरग यांच्या हस्ते करण्यात आला.


गुणवंत विद्यार्थी: विवान आबणे, वरद पाटील, चिन्मय दांगट, शिवम जठार, सिफा तुर्कीवाले, निशांत गोळे, रियांश बारपटे, प्रणील यटम आणि स्पृहा साळुंखे.


मार्गदर्शक शिक्षक: वैशाली गवळी, उमेश देसाई, प्रतिभा कांबळे, निर्मला कोळेकर, के. बी. पाटील, संदीप शिसोदे, स्वाती मोहिते, सविता कुलगुडे, स्मिता चव्हाण, प्रीती यादव आणि विजयकुमार माळी - मुख्याध्यापक.


शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जोतिर्लिंग विद्यामंदिरचे विद्यार्थी नेहमी अग्रेसर असतात. यशाची परंपरा सातत्याने जपल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक  जयश्री जाधव, प्रशासन अधिकारी यांनी केले.


प्रास्ताविकेत उमेश देसाई यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढल्याने शाळेसाठी आणखी तीन वर्गखोल्या, एक सभागृह व कंपाऊंड बांधून मिळावे तसेच  2 शिक्षक व 1 पूर्णवेळ सेवक मिळावेत अशी मागणी सभापती व प्रशासनाधिकारी यांच्याकडे केली. सूत्रसंचालन प्रतिभा कांबळे यांनी केले व आभारप्रदर्शन विजयकुमार माळी यांनी मानले.


यावेळी शिक्षक समितीच्या शहराध्यक्ष संजय पाटील, प्रियाली शिंदे, नंदिनी पाटील, सुभाष रेडेकर, उमा साळुंखे, आनंदा पाटील, अवंतिका सुतार, मीना गुरव, रूपाली राऊत व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


          ------------------------------