'जरांगे हा मराठा पुढाऱ्यांचा हँडल'

Kolhapur news
By -

 


                



मुंबई :  "मनोज जरांगे हा सर्वपक्षीय मराठा पुढाऱ्यांचा हँडल आहे." या राजकीय पाठबळामुळेच ते हे आंदोलन करत असल्याचा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांनी केला आहे. "हे तुझा उपद्रव बंद कर, महाराष्ट्राची माफी माग आणि मुंबईत येणार नाही म्हणून जाहीर कर," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना सुनावले आहे.


जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी आपण कायदेशीर लढा देणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हंटले आहे. "आम्ही कायदेशीररित्या मुंबईच्या वेशीवर तटबंदी करणार आहोत. या मुंबईला डिस्टर्ब करून, कुणालाही मुख्यमंत्री बदलू दिले जाणार नाहीत," असा इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील हे बेकायदेशीरपणे मुंबईत येऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.


      मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. जरांगेंची मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुंबईत येणार नाही असे जाहीर करावे, अशी थेट मागणी सदावर्ते यांनी केली आहे.



मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आणि त्यांच्या मागण्यांवर कडाडून टीका करताना सदावर्ते म्हणाले की, "मनोज जरांगे यांचे दोन जन्म जरी झाले, तरीसुद्धा त्यांची ही मागणी कुणीच मान्य करू शकत नाही. जरांगेंच्या मागण्या पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत.


         -----------------------------