गणेश विसर्जनाच्या ड्युटीवर : शिक्षक संघटनांचा बहिष्कार

Kolhapur news
By -

 

              


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 


घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी शिक्षकांना कामगिरी देण्यात आली आहे. सदर कामगिरी ठिकाणी शिक्षकांनी उपस्थित राहू नये असे आवाहन,कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


       गेले तीन वर्षे पासून शिक्षकांना घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जना वेळी विसर्जन कुंडावर  तसेच सार्वजनिक गणेशोत्सव संपूर्ण गणेश विसर्जन प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत विविध प्रकारची कामगिरी देण्यात आली आहे. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामाविरोधात बहिष्कार घातला होता.तसेच वारंवार अशा प्रकारच्या लावल्या जाणाऱ्या कामगिरीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच मध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.


       या याचिकेवर सुनावणी होऊन स्वयंप्रेने काम करणाऱ्या शिक्षकांना कामगिरी देण्यात यावी व कामगिरीवर उपस्थित न राहणाऱ्या कोणताही शिक्षकावर कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने गतवर्षी दिली आहेत.


     तरीही यावर्षी सर्व शिक्षकांना पुन्हा गणेश विसर्जना वेळी कामगिरी देण्यात आली आहे. याबाबत आज कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवडे व पारितोष कंकाळ यांची सर्व शिक्षक संघटनांनी भेट घेऊन निवेदन दिले असता, सदर कामगिरी ठिकाणी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक २३ ऑगष्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णय नुसार व व मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बँकेच्या आदेशानुसार सदर शिक्षकांच्या कामगिरी रद्द करण्यात यावेत अशा असे निवेदन देण्यात आले आहे.



       यावेळी राजेंद्र कोरे, विलास पिंगळे, शिवाजी भोसले,संतोष आयरे,संजय पाटील, दिलीप माने, द्रोणाचार्य पाटील, नयना बडकस, स्नेहलकुमार रेळेकर, सुभाष धादवड, नामदेव वाघ इत्यादी उपस्थित होते.

      

           --------------------



"सध्या शिक्षकांना सैनिक भरतीची ड्युटी असून गणेश विसर्जनाच्याही नेमणुका देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना वारंवार अशैक्षणिक कामे लावली जात आहेत. गणेश विसर्जन कामगिरीवर बहिष्कार घालत आहोत."


                           राजेंद्र कोरे

समन्वयक सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समिती



 उपायुक्त किरणकुमार धनवडे यांना निवेदन देताना सर्व प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी



             -------------------------