सर्वात श्रीमंत आमदाराने भिकारी बनून मागितली भीक

Kolhapur news
By -

 

               


मुंबई : मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि संपन्न राजकारणी म्हणून ओळखले जातात. पाच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक असलेल्या या आमदाराने अलीकडेच एक अभूतपूर्व प्रयोग केला. आपल्या गुरूने दिलेल्या आज्ञेनुसार त्यांनी एक पूर्ण दिवस वेषांतर करून भिकारी म्हणून घाटकोपरच्या रस्त्यांवर घालवला. ही घटना फक्त राजकीय स्टंट नव्हती, तर गुरूंच्या शिकवणुकीनुसार आत्मानुभव घेण्याचा एक प्रयत्न होता असं पराग शहा यांनी सांगितलं आहे. 



पराग शाह यांनी जैन धर्मगुरू नम्रमुनी महाराजांच्या सल्ल्यानुसार हा अनुभव घेतला. जैन चातुर्मासादरम्यान  नम्रमुनी  पराग शाह यांना एक दिवस भिकाऱ्याचे जीवन जगून तो अनुभव समजून घेण्याचा सल्ला दिला होता. आपल्या गुरूंचा सल्ला मानून, आमदारांनी आपली सुरक्षा, आलिशान गाडी आणि महागड्या वस्तू मागे सोडून एक दिवसासाठी भिकाऱ्याचे वेश धारण केला.


            वादग्रस्त निर्णय


  भाजपचे नेते नरेंद्र मेहता मीरा-भाईंदरमधील 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' ही नामांकित शाळा चालवतात. आता या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा कोणतीही कंदमुळं असलेली भाजी आणू नये असा अजब सल्ला या शाळेनं दिलाय. कारण काय ? तर म्हणे हे पदार्थ पौष्टिक नाहीत, आपण फक्त चवीसाठी हे गोष्टी खातो  असं आमदार महोदयांचं आणि शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे. सध्या जैन धर्मीयांचं पर्युषण पर्व सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर शाळेनं थेट पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हे परिपत्रकच जारी केलंय. आता यावरून संपूर्ण महाराष्ट्रात नवं वादंग सुरू झाले. शाळा ही ज्ञानाचं मंदिर आहे की धार्मिक नियम लादण्याचं केंद्र? विद्यार्थ्यांना काय खावं आणि काय नाही, हे ठरवण्याचा अधिकार नरेंद्र मेहता किंवा त्यांच्या शाळेला कुणी दिला? असा संतप्त सवाल आता पालक आणि नागरिक विचारत आहेत. "पर्युषण काळात तुम्ही आम्हाला हे कंदमुळांचे नियम सांगताय. मग उद्या गटारीच्या दिवशी आम्ही पोरांच्या डब्यात चिकन-मटण, मासे दिले तर तुम्हाला चालतील का?" एवढंच नाही, तर हा फतवा मागे न घेतल्यास शाळेबाहेर कंदमुळं आणि मांसाहार खाऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला.  इशारा देताच शाळा प्रशासनानं हा वादग्रस्त निर्णय मागे घेतला.



       ---------------------------------