कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कला कौशल्याचे महत्त्व मिळावे कृतीशैली केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते व्यक्तिमत्व विकासाचे व अभिव्यक्तीचे ज्ञान आत्मसात व्हावे हा केंद्रबिंदू म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कला कौशल्याची गोडी लागावी .यासाठी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बोरबेट येथे कार्यशिक्षण विभागांतर्गत कार्यशाळा संपन्न झाली .
यामध्ये माती पासून गणपती तयार करणे,कागदकाम ,विविध कलाकृती अशा कौशल्य विकसित कलाकृतींची प्रात्यक्षिक अध्यापिका सौ .चित्रा चौगुले यांनी दाखवून ती विद्यार्थ्यांच्याकडून करवून घेतली .शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी कला ,कौशल्याची कृती,सूक्ष्म निरीक्षण ,एकाग्रता वाढीस लागावी यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ,अधीक्षक सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
------------------------




