कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर उड्डाण पूल व्हावे म्हणून आंदोलक कृति समितीने 9ऑगस्ट या क्रांतिदिनी घोषित केलेले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तूर्त स्थगित केले आहे.
कृति समिती च्या या निर्धारित आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन दि. 10ऑगस्ट रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत उड्डाणं पुला संबंधी सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे असे समितीला वाटते.
निर्णय होईपर्यंत समितचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे असे जाहीर करण्यात आले आहे.
आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व असेच सहकार्य असू द्यावे असे कृति समितने आवाहन केले आहे.
----------------------------

