नानीबाई चिखलीत स्वातंत्र्य दिनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन

Kolhapur news
By -


                 


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क



१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नानीबाई चिखली येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक असोसिएशनचे सदस्य, धारकरी, स्वयंसेवक, राष्ट्रभक्त तसेच चिखली ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना व हुतात्म्यांना अभिवादन केले.


या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चिखली यांचे विशेष सहकार्य लाभले. राष्ट्रभक्ती, देशप्रेम आणि एकतेच्या वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला.


      -----------------------