मुरगूड शहरातून जाणाऱ्या हम रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या नादुरुस्त गटारांची नगरसेवकांकडून पाहाणी. कंत्राट दाराकडून नवीन गटारे बांधून देण्याची हमी.

Kolhapur news
By -

 


              




                      

                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


    मुरगूडच्या नाका नंबर एक ते  सर पिराजीराव तलावा पर्यंत चा राज्य रस्ता मुरगूड शहरातून जातो. यापैकी तुकाराम चौक ते तलाव हद्दी पर्यँत च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे रस्त्याच्या काँक्रिटी करणाच्या कामामुळे पूर्ण पणे तुंबलेली आहेत किंवा फुटलेली आहेत. फुटलेल्या गटारातून   दुर्गधी युक्त घाण पाणी  बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा जात आहे.


     यामुळे  शहराच्या आरोग्याची समस्या  निर्माण झाली आहे. ही गोष्ट लक्षात येताच आरोग्य विभागाच्या सभापती व उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले यांच्या नेतृत्वाखाली  नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने  प्रत्यक्ष  कामाच्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. तेथील गटारांची अवस्था पाहिली.तुंबलेल्या गटारातील दुषित पाणी सक्शन करून बाहेर काढण्यात आले. फुटलेली गटारे आणि फूटपाथ रस्त्याच्या कामाबरोबर पुन्हा करून देण्याची हमी कंत्राटदाराकडून घेतली.


   तुकाराम चौका पर्यँत हे पाणी घेऊन तेथून ते प्रक्रिया प्रकल्पा कडे पाठवण्यात येईल असे शिष्ट मंडळाने सांगितले. या शिवाय एस टी स्टॅन्ड ते तुकाराम चौक या रस्त्याचे काम सुद्धा जून मधील करारा नुसार तंत्र शुद्ध पद्धतीने झाले पाहिजे व शहराच्या आरोग्याला तथा सौन्दर्याला अजिबात धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे अशीही हमी घेतली.


   जेष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगुले, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, यांनीही आपले  मनोगत पत्रकार परिषदेत मांडले.ते म्हणाले की रस्त्याचे काम वेगात सुरु असल्याने नागरिकांना कांही गैरसोसोयीना तोंड द्यावे लागते त्याबद्दल आम्हीं दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच सर्व काम सुरळीत होईल व तशी हमी कंत्राटदारांनी सुद्धा दिली आहे.. तेव्हा नागरिकांनी थोडे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

  शिष्टमंडळातील नगरसेवक प्रतिनिधी याप्रमाणे,संभाजी आंगज, विक्रम गोधडे, सौ. सुरेखा लोकरे,इत्यादी.



   
   

   


            -----------------------------

.....