गारगोटी ते नृसिंहवाडी व्हाया मुरगूड या बससेवेचा शुभारंभ

Kolhapur news
By -

 


  

                  


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    बहू प्रतीक्षित गारगोटी ते नृसिंहवाडी व्हाया मुरगूड या बससेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. बसचे पूजन मुरगूड विद्यालय प्रशाळेचे (हायस्कुल व जुनिअर कॉलेज ) प्राचार्य एस पी पाटील व इजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष आकाश दरेकर यांचे हस्ते करण्यात आले.


  प्रास्ताविक प्रा.टिपूगडे यांनी केले. गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस टी बस अशी सेवा महाराष्ट्र भर महामंडळामार्फत सुरु आहे. त्यात एस टी संगे तीर्थाटन योजना सुद्धा सुरु आहे. नृसिंह वाडी तीर्थ क्षेत्राला बस सेवा सुरु केल्या बद्धल महामंडळाचेt त्यांनी आभार मानले व प्रवासी वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात आले.


  ही बस गारगोटी हून सकाळी 6.45 ला सुटेल वं नृसिंह वाडीस 10.05 ला पोचेल. नृसिंह वाडीतून 10.35 ला निघून 1.55 ला गारगॊटीस पोचेल.मुरगूड, निपाणी, अक्कोळ, बेडकीहाळ, कुरुंदवाड या मार्गे बस धावेल.

    यावेळी प्राचार्य व्ही. आर. भोसले, युथ सर्कल चे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,वाहतूक नियंत्रक बी. डी. परीट व डी. पी. घाटगे, चालक गजानन पाटील, वाहक एस एम तेलंग वअनेक प्रवासी उपस्थित होते. पत्रकार राजू चव्हाण यांनी आभार मानले.

     



    

                   ----------------------