मुरगूड मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा नगराध्यक्षा सौ. सुहासिनी देवी पाटील यांचे हस्ते शुभारंभ.

Kolhapur news
By -

 


          


                  

               


 
           कोल्हापूर न्यूज नेटवर्क



मुरगूड येथे राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची सुरुवात मुरगूडच्या नगराध्यक्षा सौ.सुहासिनीदेवी पाटील यांचे हस्ते करण्यात आली.


   O ते 5 वयोगटातील मुलांना ही लस दिली जाते. ग्रामीण रुग्णालयाने घरोघरी जाऊन या वयोगटातील मुलांचा सर्व्हे केला होता. मुलांचे पालक आपल्या मुलांसह  सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालयात उपस्थित राहिले होते. पोलिओ डोस घेणे किती गरजेचे आहे हे डॉ. प्रविण कानडे, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय यांनी समजावून सांगितले.लसी अभावी पोलिओला बळी पडलेल्या अनेक  व्यक्ती आपण समाजात पहतो.कुटुंब निरोगी तर राष्ट्र निरोगी. असे सांगून पल्स पोलिवो लसीकरण मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.


या वेळी  उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, नगर सेवक सुनील रणवरे, डॉ.शिवाजी घुमरे, परिचारिका सौ.पल्लवी अडसूळे, सौ. सुरेखा कांबळे,सौ.योगिता चौगुले.संकेत चौगुले (mpw),अंगणवाडी सेविका सौ. माळी ई. उपस्थित होते.



            --------------------------------