कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथे लवकरच लग्न सोहळा मराठी मॅट्रिमोनीची सुरुवात होणार आहे. येथील प्रसिद्ध उद्योजक ऋषिकेश बोरगावे यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून या मॅट्रिमोनी ची स्थापना करण्याचे ठरवले आहे.मुरगूडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते या मॅट्रिमोनीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
वधू वर संशोधन एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली lअसून विवाह लांबणी वर पडल्यास जीवनाची घडी विस्कटण्याची शक्यता असते.विवाह आणि त्यानंतर लगेच घटस्फोट होणे यासारखे प्रकार सद्या वाढत चालले आहेत.
करिअर च्या मागे लागलेल्या मुला मुलींना स्वतःच्या विवाहा कडें लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. पालक ही हताश होतात. कौटुंबिक गरज म्हणून नोकरीं करत मिळेल त्या जोडीदाराशी वैवाहिक संबंध जोडण्याची प्रथा पडत चालली आहे. हे विवाह आंतराजातीय सुद्धा असू शकतात. त्यामुळे पुढे अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात.
यासाठी योग्य वयात योग्य वधु वर संशोधन करून या सामाजिक समस्ये वर मार्ग काढण्याचा हा प्रयत्न आहे असे बोरगावे यांनी कोल्हापूर न्यूज नेटवर्क प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.विवाह जुळणी साठी पत्रिका तथा कुंडली वगैरे धार्मिक बाबी पण मॅट्रिमोनी कडून अत्यल्प खर्चात पाहण्याची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------

