समग्र शिक्षा विभागाकडील कर्मचारी शासन सेवेत कायम :- कॅबिनेट मत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये घोषणा : जिल्ह्यात आनंदोउत्सव साजरा

Kolhapur news
By -

 


          

 



                 


                      कोल्हापूर  न्यूज नेटवर्क



  राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत विविध पदावर कंत्राटी स्वरुपात कार्यरत असणारे कर्मचारी गेल्या 21 वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते. मागील अनेक वर्षाच्या संघर्षाची शासनाने दखल घेत दिनांक  02 जुलै 2026 च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत सामावून घेण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.


जिल्ह्यात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घेणेत यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती .


आत्तापर्यंत अत्यल्प वेतनावर आपले कामकाज प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडले आहे. मागील काही वर्षापासून समग्र शिक्षाच्या कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधले होते. यावर्षी या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 9 मार्च 2026 पासून सलग 117 दिवस आपल्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनांमध्ये संपूर्ण राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा मोठया प्रमाणात सक्रीय सहभाग होता. 


  दिनांक 2 जुलै 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्यावर या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात येत आहे. यावेळी समग्र शिक्षा विभागाच्या कर्मचारी यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही मोठा जल्लोष केला. या निर्णयाचे स्वागत करून शासनाचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले.


  राज्यातील सर्व कर्मचारी हे पदवी, पदवीधर उच्चंप्रशिक्षित तसेच असून हे कर्मचारी विविध पदावर कार्य करीत असताना या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासून शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी होती. या शासनाच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या या चांगल्या निर्णयामुळे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्वीकारलेले सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष,  प्रा . मनोहर धोंडे यांनी समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले. राज्यातून समग्र शिक्षा च्या कर्मचाऱ्यांकडून प्रा . मनोहर धोंडे यांचे आभार मानण्यात आले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे हे यश मिळाले आहे. 


जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी,लेखाधिकारी, उपशिक्षणाधिकारी ,त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख यांनी कर्मचाऱ्यांची कौतुक केले .


      या मान्यवरांचे सेवेतील कर्मचाऱ्यांनी मानले आभार -


  शासकीय सेवेत कायम केले बद्दल महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री, सुनेत्राताई पवार, शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे ना. गिरीश महाजन, कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे, शिराळयाचे आमदार सत्यजित देशमुख, जतचे आमदार  गोपीचंद पडळकर,  संभाजी भिडे गुरुजी यांचे समग्र शिक्षा संघर्ष समितीच्यावतीने आभार मानले आहे.


         सुमारे पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेचा ...व 117 दिवसाच्या संघर्षाचा काळ संपला -


गेल्या 25 वर्षापासून सुरू  असलेल्या संघर्ष आज संपला अनेक  कर्मचाऱ्यांनी अल्प - मानधनावरती काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवला,त्यामध्ये अनेक सेवानिवृत्त झाले .


                   सागर पाटील -

            वरिष्ठ लेखा 

लिपिक पंचायत समिती गगनबावडा


  -----------------------------------