टी 20 च्या तिसऱ्या सामान्यत भारताची इंग्लंड कडून लाजिरवाणी हार.

Kolhapur news
By -

 

           


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   टी 20 क्रिकेट मधील तिसऱ्या आंतराष्ट्रीय सामन्यात इंग्लंड कडून  भारताची लाजिरवाणी हार झाली आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने दमदार फलंदाजी करत 7 गडी गमावून 201 धावा केल्या. 


   भारताला 202 धावांचे आव्हान मिळाले होते. भरताने  11.4 षटकात सर्व गडी  गमावत  अवघ्या 76 धावा केल्या. 125 धावांनी  भारताची लाजीरवाणी हार  पहायला मिळाली.


   आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भारतीय संघात प्रथम पदार्पण करणाऱ्या व सचिन तेंडुलकरचे अल्प वयीन खेळाडूचे  रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभव सूर्यवंशी ने अवघ्या 13 धावा केल्या. त्या पूर्वी अभिषेक शर्मा अवघ्या 10 धावा करून बाद झाला. या दोघांनंतर बाकीच्या सर्व खेळाडूंनी अक्षरशः हाराकिरी करत अवघ्या 76 धावा जमवल्या.


    श्रेयस च्या नेतृत्वा खालील ही इंग्लंड विरुद्ध दुसरी हार होय.

  नेदरलंड विरुद्धची मालिका सुद्धा भारत हारला आहे. तिकडे महिला  खेळाडू सुद्धा टी 20 च्या विश्व चषक सामन्यात हार खाऊन माघारी  परतल्या आहेत.


  2026 वर्षात भारतीय क्रिकेट ला खग्रास  ग्रहण लागले आहे की काय अशी अवस्था पहायला मिळत आहे.  16 व्या वर्षात पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेट मधील अभिमन्यू तर ठरणार नाही ना अशी  अवस्था भारतीय क्रिकेट  संघाची झाली आहे.


     इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या  मालिकेतील पहिला सामना पावसाने जिंकला. दुसरा व तिसरा इंग्लंड ने जिंकले. उरलेले 2  सामने जिंकून निदान बरोबऱी करावी अशी अपेक्षा क्रिकेट रसिक करत  आहेत.


          -------------------------------