कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पट्टणकोडोली येथे शिवप्रेमींच्याकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिव पुतळा उभारण्यात आला होता . हा पुतळा कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून हा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या . यासाठी आज गावामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. प्रांताधिकारी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित झाले होते, मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी लावण्यात आला होता .
प्रशासनाने शिव पुतळा हटवण्याची कार्यवाही सुरू केल्यामुळे ग्रामस्थ आणि शिवप्रेमी आक्रमक झाले, आणि पुतळ्यासमोर घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे तणावाचे वातावरण होते .अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना फोन आला आणि पुतळा न हटवण्याची त्यांनी सूचना केली.
पुतळा हटवण्याऐवजी झाकून ठेवण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली. जोपर्यंत सर्व परवानग्या मिळत नाहीत तोपर्यंत हा पुतळा हलवू नये अशी सूचना करण्यात आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निवळले आणि प्रशासन ,ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
-------------------------------------

