कोरटकरचा जामीन फेटाळला : काेठडीतला मुक्काम वाढला

Kolhapur news
By -

                


           कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान 5 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आता कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.


प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर प्रशांत कोरटकरने जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयाकडे अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.


   --------------------------------------------