नोकरीतून निवृत्ती होते, पण शिक्षक कधीच निवृत्त होत नाही - अशोकराव चाळके

Kolhapur news
By -

 


             


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  नोकरीतून निवृत्ती होते, पण शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. त्यांच्या शिकवणीचे संस्कार आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक असते  असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोस्ट मास्तर व श्री संत बाळूमामा सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चाळके यांनी केले. 



       बाळूमामा नगर येथील व शिवराज विद्यालय कौलगे येथे कार्यरत असलेले व्हरे एल एस ३१  वर्षाच्या सेवेनंतर  ३० जून २०२६ राेजी निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार प्रसंगी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक उदय नाईक होते. 



      यावेळी व्हरे सरांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल व्हरे सरांनी कृतज्ञता व्यक्त केली. 



     सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव सव्वाशे सर , कृष्णा बागडे सर , शशिकांत ताेडकर सर , नामदेव पाेवार सर यावेळी उपस्थित होते. 



             -------------------------------