गोकुळ नाही कुणाच्या बापाचे गोकुळ आमच्या हक्काचे दुध उत्पादक बंधू आणि भगिनी यांची हाक.

Kolhapur news
By -

              



                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


 राधा : गंगू, काय चाललय? सकाळी एकदम शेणाची पाटी घेऊन निघालीस.


 गंगू :राधा वैनी, हे रोजचंच हाय. गोट्यातलं म्हसरांचं आणि गायरांचं शान आणून गारित   टाकायला लागतंय.


   राधा : असं होय. दुधाचा धंदा आहे का ? 


 गंगू.: व्हय. सकाळी चार ला उठायला लागतंय. आवरायला 10 बी वाजत्यात.


   राधा : दूध  कुठे घालतेस?


  गंगू : हितच की, गोकुळ वाल्यांची  डेरी हाय.


  राधा : छान. गोकुळ खरंच चांगली संस्था आहे. बिलं अगदी वेळेवर देते. दर पण देते.


  गंगू : व्हय, पर म्हसरांचा खर्च तरी भागाय पायजे. कडबा कुटी मशीनचं कर्ज फिटाय न्हाई. खाद्य येतंय त्येला पैसे पुरत न्हाईत.


  राधा :  अगदी बरोबर. गोकुळ चालवणारे मात्र मजेत आहेत.विमानाने फिरतात. दुबई दौरा करतात. वाळूच्या देशात दुधाचा अभ्यास दौरा करतात. होय ना ?


 गंगू : राधा वैनी, तुम्हीं काय म्हणताय ते आम्हां गरिबांसनी कळत न्हाई. आमचं पोट नीट चाललं पाहिजे.


 राधा : तेच सांगायचंय मला. गोकुळ तुम्हां दूध उत्पादकांच्या मालकीचेच असले पाहिजे म्हणजे गोकुळ मध्ये जेवढे उत्पन्न मिळते नफा मिळतो तो उत्पादकांना वाटला गेला पाहिजे. गोकुळ चालवणारे  ठराव गोळा करतात आणि खुर्चीवर जाऊन बसतात. तुम्ही आम्ही शेणाच्या बुट्टे टाकत बसतावय.


गंगू : व्हय व्हय,ठराव का काय ते गोळा करायचं चालू हाय.चेअरमन च्या नावाने ठराव काढलाय. चार-पाच लाख रुपये घेऊन बसलाय त्यो. ट्रक्टर घेणार म्हणतोय.


किसना : काय चाललंय दोघींचं ? मोटर सायकल वरून वैरणीचा भारा  आणला ढोरासनी.रस्ता भरून भारा असतोय. ट्रॅफिक सांभाळत  याय लागतंय.


 राधा : गोकुळचा विषय चालला होता. डेअरी चेअरमन ट्रक्टर घेणार म्हणतोय.


किसना : बिडी फुकत पारावर बसतोय  आणि ट्रॅक्टर काय घेतोय ! 

 50  लिटर  दूध एकटा घालतोय तरी अजुन माझी मोडकी मोटर सायकल हाय. आणि चेरमन एकदम ट्रॅक्टर ?


 राधा : किसनराव. यालाच गोकुळ म्हणतात.. तुमच्या आमच्या वेळचं गोकुळ आता राहील नाही. चेअरमनला ठराव चे 6लाख आणि ट्रॅक्टर ला कर्ज मंजूर होईल. आहात कुठं ?


किसन : गोकुळ ची बासुंदी आम्हांला दिवाळीला भी भेटत नाही. संचालक रोज वरापत्यात.


राधा : सरकारने महिला शेतकरी सन्मान बिल पास केलंय. गोकुळ खरं तर त्यांच्या मूळच सुरु आहे. आता  आंदोलन हाच मार्ग.


 गंगू आणि किसना :व्हय आता तेच करायचं.


राधा : मोर्चा काढू.घोषणा देऊ. गोकुळ आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं.

 बोला  छत्रपती शिवाजी महाराज की जय.


                    -------------------