'असर' चा अहवाल सरकारी शाळांची बदनामी करून समाजाची दिशाभूल करणारा : बानगे केंद्रातील सर्व शिक्षकांनी असर अहवालाची केली प्रतीकात्मक होळी

Kolhapur news
By -

 

         


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       दरवर्षी शाळांची शैक्षणिक स्थिती दर्शवणारा असरचा अहवाल प्रसिद्ध होतो आणि सरकारी शाळातील मुलांची गुणवत्ता खालवण्याचे जाहीर केले जाते हे एक सरकारी शाळा बदनाम करून बंद पाडण्याचा एन.जी.ओं.चा अघोषित डाव असल्याचे सांगत बानगे केंद्रातील  सर्व  शिक्षकांनी असर अहवालाची प्रतिकात्मक होळी केली. पिंपळगाव बु. येथील  शिक्षण परिषदेच्या निमित्ताने  एकत्र आलेल्या सर्व प्राथमिक  व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येत असर अहवालाची प्रतिकात्मक होळी करून असर संस्थेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी  यावेळी सर्व संघटना प्रतिनिधी  बानगे केंद्रांच्या केंद्रप्रमुख , सर्व मुख्याध्यापक ,केंद्रातील सर्व शिक्षक, उपस्थित होते 

       


    असरसारखी गैर सरकारी संस्था  काही मोजक्याच शाळांना भेटी देऊन सगळ्याच शाळातील शिक्षणाची स्थिती वाईट असल्याचा धादांत खोटा प्रचार करते त्यामुळे सरकारी शाळा बदनाम होतात.


            ----------------------------------