वैश्विक कार्ड तालुका पातळीवर देणार - पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर

Kolhapur news
By -

 

       

             





                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    दिव्यांगांची ओळख ठरणारे  वैश्विक कार्ड  तालुका पातळीवर वैद्यकीय तपासणी करून देण्याची घोषणा पालकमंत्री   प्रकाशराव आबिटकर यांनी केली.  


आज  स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सामाजिक कृतज्ञता निधीतून  अलिमको मार्फत आणि *जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाज कल्याण विभाग ,जिल्हा परिषद, कोल्हापूर* यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले.  


या समारंभात पालकमंत्री श्री. प्रकाशराव आबिटकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “दिव्यांगांच्या नशिबात शरीराने दिव्यांगता आली असली तरी त्यांच्यातील वेगवेगळ्या कला व गुण हेच त्यांचे वरदान आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने मनापासून कार्यरत राहावे. यासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.” 


समारंभाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी मा. श्री. संजय शिंदे, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सुजाता इंदुलकर व मुख्य व्यवस्थापक मंदार पुनाळकर, मा. अतुल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.  


कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक श्री. अमेय जोशी यांनी केले, तर आभार  जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि. प.) श्री. संभाजी पोवार यांनी मानले.


    ------------------------------------