मुंबई : या अर्थसंकल्पात महिलांना 2100 देणार असे वक्तव्य केले नाही, जाहीरनामा ५ वर्षांसाठी असतो असे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जाहीरनामा हा ५ वर्षांसाठी असतो त्यामुळे याच अधिवेशनात 2100 रुपये महिलांना देणार असे वक्तव्य आम्ही कुठेच केले नाही, असे विधान अदिती तटकरे यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बजेटच्या वेळी 2100 रुपये घोषित करू असे वक्तव्य केले नाही. 100 टक्के आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. पाच वर्षांसाठी जाहीरनामा तयार केलेला असतो. मंत्रिमंडळ जेव्हा तसे सूचित करेल तेव्हा आमच्या खात्याकडून तसा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली आहे.
अदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून योजनेवर टीका सुरू आहे. ही योजना लाडक्या बहिणींची सर्वात आवडती योजना ठरली. म्हणून कुठेतरी पहिल्या महिन्यात पावणेदोन कोटी महिलांना लाभ मिळाला. तर निवडणुकीनंतर 2 कोटी 45 लाख महिलांना लाभमिळाला. तर आता 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ देणार आहोत. आम्ही निवडणुकीच्या आधी वेगळी निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेत नाही.
------------------------------------

