कोल्हापुरात लोककलांतून उलगडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट

Kolhapur news
By -

 

         


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त मंगळवारी दि. 18 रोजी पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात 'जागर अहिल्यादेवींच्या प्रेरक जीवन चरित्राचा वसा पारंपारिक लोक संस्कृतीचा' हा कार्यक्रम  पार पडला. 


पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट या कलाप्रकारांतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट उलगडला. अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


युवा कलारत्न शाहीर शुभम अवधूत विभुते आणि संच यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. 


      यावेळी प्रा. शरद गायकवाड म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उत्कृष्ट राज्य कारभार केला. शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. यासह विविध प्रकारचे सामाजिक कार्य करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.


बबनराव रानगे म्हणाले.भारतात महिलांची सशस्त्र सेना निर्माण केली. उत्कृष्ट न्यायव्यवस्था निर्माण केली. कोणत्याही लढाईशिवाय आदर्शवत राज्यकारभार केला. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, शाहीर शुभम विभुते, प्रा. सयाजी गायकवाड, सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.

 

बाळासाहेब भोसले, डी. जे. भास्कर,राघू हजारे, प्रकाश पाटील, प्राचार्य टी. नो के. सरगर, चित्रपट समीक्षक अनमोल  कोठाडिया आदी उपस्थित होते.  


 कार्यक्रमात होळकर यांचा अहिल्यादेवी जीवन चरित्रावर आधारित शाहिरी पोवाडे, लघुपट, धनगरी ओव्या, जोतिबाच्या सासन-काठीवर आधारित लेझीम नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.


  मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे व प्रा.शरद गायकवाड यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले.स्वागत शाहीर शुभम विभूते यांनी केले.आभार प्रा. सयाजी गायकवाड यांनी  मानले. 





    ---------------------------