पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी प्रकारच्या १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील पूजांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी प्रकारच्या उपलब्ध करून देण्यात येतात. आगामी १ एप्रिल ते ३१ जुलै या काळातील पूजेबाबत मंदिर समितीच्या ३ मार्च रोजीच्या सभेत निर्णय झालेला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www .vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
-----------------------------------

