कोल्हापूर न्यूज नेटवर्क
डॉ.मंजिरी अजित मोरे यांची शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर निवड झाली आहे.या समितीचे विद्यापीठाच्या सर्व शाखांवर नियंत्रण असते. विद्यापीठ व्यवस्थापनाचे अंतिम निर्णयही या समिती कडे असतात.
डॉ.मंजिरी या कोल्हापुर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन आहेत.शिक्षण महर्षी स्व.एम आर देसाई यांची नात व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई यांची कन्या असा मोठा वारसा डॉ.मंजिरी यांना लाभला आहे. सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई , उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,पेट्रन युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी पृथ्वी मोरे , कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोल्हापूर, पेठवडगाव,वेंगुर्ला,कागल,मुरगूड, कापशी येथे शाखा आहेत.या सर्व शाखांच्या शिक्षक,प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थांनी आपल्या लाडक्या चेअरमन मॅम चे या निवडी बद्दल सहर्ष स्वागत व अभिनंदन केले आहे.
डॉ.मंजिरी यांनीही सर्वांचे विनम्र आभार मानले आहेत.
-----------------------------------