नानीबाई चिखलीत क्रांतिवीर हुतात्मा मल्लू चौगुले यांना अभिवादन

Kolhapur news
By -

 

              




    


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


       १३ /१२ /१९४२ रोजी गारगोटी येथे झालेल्या रणसंग्रामामध्ये हौतात्म्य पत्करलेले चिखलीतील पहिले हुतात्मा क्रांतिवीर हुतात्मा मल्लू चौगुले यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.  



   संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान व सरपंच युवराज कुंभार यांच्या हस्ते  हुतात्मा मुल्लू चौगुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.चिखली इंग्लिश स्कूल चिखलीतील विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर व  स्वातंत्र सैनिक यांचे पोस्टर घेऊन प्रभात फेरी काढली . कुमार विद्या मंदिर , कन्या विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थीही यावेळी सहभागी झाले होते. क्रांतिवीरांच्या बलिदानामुळेच आज आपण सुख शांतीने तसेच विविध पदे उपभोगत आहोत असे  प्रतिपादन मुख्याध्यापक शरद बोरवडेकर यांनी यावेळी  बोलताना केले . 



या कार्यक्रमास गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकान,  सरपंच युवराज कुंभार , माजी उपसरपंच विजय घस्ती, तंटामुक्त समिती अध्यक्ष नसरुद्दीन नाईक, ग्रामपंचायत सदस्य साधना जाधव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, शिवगोंडा चौगुले, तसेच सूर्यकांत ताटे, बळीराम चव्हाण, प्रवीण वाडकर, गुलाब शेख, शहाजी कोगनुळे, कुमार कोगनुळे, बाळकृष्ण चव्हाण, बाळासो चौगुले, बाबुराव वाडकर, सर्जेराव वाडकर, विजय पाटील, बाबासो कांबळे, खुडे सर, शिंत्रे सर, सावंत बेनाडे, सुरेश बेनाडे यांच्यासह इतर उपस्थित होते. आभार व सूत्रसंचालन नजीर नाईक यांनी केले. 




 -----------------------------------------------