शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

Kolhapur news
By -

                    



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर  कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


    प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्याला महिन्याभरापूर्वी तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने तो जामिनासाठी प्रयत्नशील होता. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला.


कोर्टाने यापूर्वी त्याला प्रथम तीन, तर नंतर दाेन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. तेव्हाच त्याला जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानंतर आज अखेर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला.


     -------------------------------