मुरगूड येथे भाट समाजा चे वतीने हनुमान जयंती उत्साहात संपन्न

Kolhapur news
By -

 

        



    



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुरगूड येथे श्री पूजक भाट समाजाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात संपन्न झाली.


    सकाळी साडे पाच वाजता श्रींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दीपक बहुधान्ये यांनी  विधिवत मंत्रोच्चाराने अभिषेक व पूजन करवून घेतले. बरोबर सकाळी ६.२४ ला जन्म काळ होता.पूर्व दिशेला सूर्यदेवांचा लालिमा दिसू लागताच श्रींच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.महिला भगिनींनी हनुमंताचा पाळणा म्हंटला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रसाद व सुंटवडा वाटून भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी झाली.

   

भाट समाजाच्या वतीने  गेली सत्तर वर्षे नित्य हनुमान जयंती साजरी करण्यात येते.पूर्वजांनी  तीर्थक्षेत्र काशीहून संगमरवरी मूर्ती आणून बाजार पेठेतील सध्याच्या राणाप्रताप चौकात स्थापन केली आहे.पंचक्रोशीतील भक्त या छोट्या मंदिरात दर्शनासाठी येतात.मंदिर साधेच असले तरी देवस्थान जागरूक असल्याची माहिती लक्ष्मण भाट यांनी दिली.यावेळी भाट समाजातील इतरही सर्व भाविक उपस्थित होते.त्यांची नावे याप्रमाणे .नारायण भाट, भरत भाट,जनार्दन भाट,गोपी भाट,नामदेव भाट,शिवाजी भाट,यशवंत भाट,राजू भाट,सर्जेराव भाट, इत्यादी.




     --------------------------------------