भाषावादावर पंतप्रधानांनी साधला निशाणा

Kolhapur news
By -

       



  चेन्नई :  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि केंद्र सरकार यांच्यात वैद्यकीय परीक्षा प्रवेश, नवीन शैक्षणिक धोरण आणि भाषेच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रामेश्वरम येथे सभेत भाषण केले. 


पंतप्रधान मोदींनी तामिळनाडू सरकारवर टीका करताना सांगितले की, त्यांना अनेक तामिळ नेत्यांची पत्र येतात, परंतु कोणत्याही पत्रात तामिळ भाषेत स्वाक्षरी नसते. मोदी म्हणाले, "सरकार सातत्याने हे सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे की तामिळ भाषा आणि वारसा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावा." त्यांनी पुढे सांगितले की, "जर तुम्हाला तुमच्या तामिळ भाषेचा अभिमान असेल, तर मी आग्रह करतो की तुम्ही तुमच्या नावावर किमान तामिळमध्येच स्वाक्षरी करा."


  ----------------------------