महिला आयएएस अधिकाऱ्याशी गिरीश महाजन यांचे संबंध - एकनाथ खडसेंचा सनसनाटी आरोप : ... तर मी राजकारणातून बाहेर पडेन - गिरीश महाजन

Kolhapur news
By -

           


जळगावगगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या 'रंगल्या रात्री अशा' गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.


अमित शहा यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की तुझे एका महिला आयएस अधिकारासोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की, नाही माझे कामानिमित्त बरेचसे अधिकाऱ्यांशी बोलले सुरू असते पण शहांनी त्यांना सांगितले की ,तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध सीडीआर खर बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले, असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


मला वाटते की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शहांना भेटणार आहे आणि अमित शहा आणि माझी भेट होतच राहते त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे, असं खडसे म्हणाले. 



   खडसेंचे सगळे संपले, त्यामुळेच ते असे बरळतात - महाजन


दरम्यान, भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरे काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचे असेल तर त्यांना बाहेर पडणे मुश्किल होईल. त्यांचे सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात, असा पलटवार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला.


मी तोंड उघडल्यास लोक त्यांना जोड्याने मारतील


ते ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत. बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावे, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावे. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात, त्यांच्याकडे हे आहे, ते आहे. मात्र कशासाठी ते असे करतात? ते लोकांची दिशाभूल करतात. मात्र मी जर काही सांगितले तर लोक त्यांना जोड्याने मारतील. मी त्यांच्या प्रमाणे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरेखालची भाषा शोभत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.


... तर मी राजकारणातून बाहेर पडेन - महाजन


   गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चरित्रहनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेले नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता ?  तुमच्याकडे पुरावा असेल तर तो लोकांना दाखवा. यांना दिले, त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते, डिलिट झाले, मोबाईल हरवला हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का ? माझे आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला आहे.


           --------------------------